Monday, June 25, 2007

ग़ज़ल बाराखाडी

ग़ज़ल बनते ती काही नियम अनुसरुन्....
आपण काफिया आणि रदीफ़ काय असते ते पाहिले आहेच - काफिया म्हणजे आपले यमक आणि रदीफ़ म्हणजे अंत्य-यमक!

"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" ही सु-प्रसिध्द मराठी ग़ज़ल अणि ग़ज़ल नियम कसे आहेत ते बघुयात...

- 2 ओलिंच्या कवितेला 'शेर' म्हणतात ...आणि असे किमान ३ ते ५ शेर घेवुन ग़ज़ल बनते!
......."सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" मधे 4 शेर आहेत
- पहिल्या शेर मधे ग़ज़ल मधील 'ज़मीन' बनते....'ज़मीन' म्हणजे आपण त्यास 'थाट' म्हणु शकतो...... ........'अकेलापन' थाट "सुन्या सुन्या " मधे...
- ग़ज़ल मधील पहिल्या शेर मधे पहिल्या ओलित यमकास सुरुवात मिलते
........ 'गीत गात' ही यमकास सुरुवात करून देणारा शब्द तर दुस-या ओलित - ' चांद रात ' हे यमक...आणि 'आहे' हे अंत्ययमक...
- पुढे प्रत्येक शेर मधे दुस-या ओलित यमक आणि अंत्य-यमक जुलले पाहिजे
......'आरशात', 'पारिजात', 'अंतरात' हे यमक आणि 'आहे' हे अंत्य-यमक येत आहे...

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात
आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात
आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात
आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे

- कवि सुरेश भट